त्र्यंबकेश्वर मंदिर व मंदिर परिसरात म्हणजेच ताम्रपत्रधारी गुरुजींच्या निवासस्थानी पूजा करण्याचे वंशपरंपरागत अधिकार त्र्यंबकेश्वर मधल्या स्थानिक गुरुजींकडे आहेत. अनेक पंडित किंवा गुरुजी काळसर्प दोष शांती पूजा, नारायण नागबळी पूजा, महामृत्युंजय मंत्र जाप विधी इत्यादी अनेक अनुष्ठान करीत असतात.
ऐतिहासिक माहितीनुसार पेशवेकाळात श्रीमंत पेशवा बाळाजी बाजीराव भट (श्री नानासाहेब पेशवा) यांनी इथल्या स्थानिक व परंपरेने जाणकार असलेले पुरोहित व त्यांच्या वंशातील सदस्यांना ताम्रपत्रावर अधिकार बहाल करण्यात आले. या अधिकृत पुरोहितांना “ताम्रपत्रधारी गुरुजी” म्हटले जाते.
ताम्रपत्रधारी गुरुजींकडून केल्या जाणाऱ्या सर्व विधी ह्या शास्त्रोक्त पद्धतीने वारसाहक्काने प्रशिक्षित विद्यासंपन्न ताम्रपत्रधारी गुरुवर्यांकडून प्राप्त झाल्याने त्वरित फलदायी होतात.
त्र्यंबकेश्वर मंदिरात कार्यरत असलेले सर्व अधिकृत आणि नोंदणीकृत “ताम्रपत्रधारी गुरुजी” आपल्या माहिती साठी पुढील यादीत समाविष्ट केले आहेत. केवळ सदर गुरुजींकडे विशेष पूजा जसे नारायण नागबळी पूजा, काळसर्प योग शांती, त्रिपिंडी श्राद्ध पूजा, महामृत्युंजय मंत्र, रुद्राभिषेक पूजा तसेच अन्य विधी यथासांग पद्धतीने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात करण्याचे अधिकार ताम्रपत्रावर अंकित केलेले आहे. खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून आपण अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींना संपर्क करू शकता.
धार्मिक संस्काराचे ज्ञान हे वंशपरंपरेने वेदशास्त्रसंपन्न मान्यवरांकडून पिढ्यानपिढ्या चालत असते, ते साधारण पूजेपेक्षा वेगळे असते कारण त्यात अशा अनेक पद्धती असतात ज्या सर्वसाधारणपणे पूर्वापार पिढ्यानी अनुभवसिद्ध केलेल्या असतात. त्यामुळे घरघुती पूजेचा लाभ तसेच जागृत देवस्थानातील जसे त्र्यंबकेश्वर गुरुजी करीत असलेल्या पूजेचा लाभ यात फार अंतर असते.
याशिवाय जागृत देवस्थान याचा मुळात अर्थच हा आहे कि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ज्योतिर्लिंगाचे वलय हे अदृश्य शक्तीने वेढलेले असते त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात अथवा मंदिर परिसरात केलेल्या पूजा किंवा धार्मिक विधी हे लवकर फलित होतात, त्यामुळे अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींकडून पूजा केल्यास लाभ होणे निश्चित आहे.
ताम्रपत्र हे भारतातील तांब्यापासून निर्मित माहितीपर पत्र (लेख) असतो. किती अक्षरे त्यावर कोरलेली आहे यानुसार ह्या पत्र्याची उंची व जाडी निर्धारित ठरवली जाते. इतिहासात अनेक ठिकाणी मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी पूर्वी स्तंभावर, किंवा दगडी शिलालेखांवर माहिती कोरून ठेवली जात असे. कालांतराने ताम्रपत्रावर सूचना अथवा मालकी हक्क कोरून ठेवले जाऊ लागले. अशा प्रकारे पेशवेकालीन इतिहासाप्रमाणे त्र्यंबकेश्वर मधील गुरुजींकडे अधिकृत ताम्रपत्र उपलब्ध आहे. ज्याचे संरक्षण पुरोहित संघ संस्था त्र्यंबकेश्वर द्वारे केले जाते. भाविकांनी अधिकृत ताम्रपत्र तसेच नोंदणीकृत प्रमाणपत्राची खात्री करूनच पूजा, विधी अथवा अनुष्ठान आदी करावेत.