नारायण नागबली पूजा हि दोन विविध पूजांचे एकत्रीकरण आहे, ज्यात नारायण बळी पूजा व नागबळी पूजा यांचा समावेश आहे. ह्या दोन्ही पूजा नारायण नागबळी पूजा म्हणून एकत्रितच केल्या जातात. याला कारण असे आहे कि आपल्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीची मृत्यू कुठल्या कारणाने झाली आहे हे निश्चित माहिती नसते, त्यामुळे असे पूर्वज मृत्युलोकात भटकतात आणि परिणामी पितृदोष भोगावा लागतो. त्यामुळे ह्या क्रियेमध्ये व्यक्तीचे नाव अथवा गोत्राचा उच्चार वर्ज्य आहे. हि पूजा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातच केली जाते, जिथे ब्रह्मा, विष्णू व महेश हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जागृत आहेत.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुर्मरण येते तेव्हा अशा व्यक्तीच्या आत्मशांती प्रित्यर्थ नारायण बळी पूजा करावी असा शास्त्रांमध्ये उल्लेख केला आहे. हि पूजा न केल्यास श्राद्ध केले तर ते अंतरिक्षात वाया जाते.
- - गरुडपुराण, धर्मकाण्ड, अध्याय ४
श्लोकार्थ - दुर्मरण आल्याने मृत परिजनांना दिलेले श्राद्ध अंतरिक्षातच नष्ट होते. त्यासाठी प्रथम नारायण बळी पूजा करणे आवश्यक आहे.
नागबळी पूजेचे अनुष्ठान नाग हत्येच्या पापातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती नागाची हत्या करते अथवा त्यात सहभागी असते तेव्हा अशा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा अशा व्यक्तीने या पापातून निवारण करण्यासाठी नागबळी पूजा करावी.
नारायण नागबळी पूजेला तीन दिवसांचा कालावधी लागतो. ज्यात पुढीलप्रमाणे धार्मिक क्रिया केल्या जातात.
नारायण नागबळी पूजा मंदिराच्या पूर्व दरवाज्याला असलेल्या अहिल्या गोदावरी मंदिर तसेच सतीचे महास्मशान इथे केली जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ब्रह्मा-विष्णु-महेश ह्या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप असलेले विशेष ज्योतिर्लिंग आहे.
- मत्स्यपुराण, अध्याय २२ (श्राद्धयोग्यतीर्थवर्णन)
श्लोकार्थ - सर्व तीर्थांपैकी त्र्यंबकेश्वर नामक तीर्थ हे तीर्थराज आहे, इथे साक्षात त्रिनेत्रधारी श्री शंकर उपस्थित आहेत. इथे श्राद्ध केल्याने कोट्यानुकोटी फळ देणारे आहे. या तीर्थाचे केवळ स्मरण केल्याने पापसमूहाचे शेकडो तुकडे होऊन नष्ट होते.