कलियुगात सर्व संतांनी नामस्मरण हाच तरणोपाय सांगितला आहे, तेव्हा अगदी सहज प्रसन्न होणारी देवता असेल तर ती एकमात्र भोलेनाथ होय. भक्त त्यांना भोळा भंडारी देखील म्हणतात, कारण ते आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तेव्हा नामस्मरणाने सर्वात सहज प्रसन्न होणारे एकमात्र देव म्हणजे देवाधिदेव महादेव होय. त्यांनाच मृत्यूवर विजय प्राप्त केलेली देवता - महामृत्युंजय असे म्हटले जाते. जेव्हा भक्तांच्या जीवनात जन्मपत्रिकेत अल्पायु असते किंवा अकाली मरण असते तेव्हा ते टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्र जाप करावे असे शास्त्रात निर्देश केले आहेत.
- ऋग्वेदः मण्डल ७ सूक्त ५९
श्लोकार्थ - हे त्रिनेत्रधारी परमेश्वरा, आम्हाला मृत्यूच्या पाशातून मुक्त करून शाश्वत जीवन प्रदान कर. ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी अलगद झाडावरून खाली पडते अगदी त्याप्रमाणेच आम्हाला या संसारातून मुक्त करून तुझ्या पावन चरणी अमरत्व प्राप्त व्हावे असा वरदान दे.
श्री ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिदेवांचे एकत्रीकरण असलेले एकमेव असे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. वास्तविक त्रिमूर्तीस्वरूप महादेव हेच भगवान महामृत्युंजय आहे. त्यामुळे इथे केलेले मंत्र जप, होम-हवन, यज्ञादि त्वरित लाभ देतात, असा भक्तांचा नित्य अनुभव आहे. म्हणूनच देश विदेशातून इथे अनेक भक्त मनोकामना सिद्ध करण्यासाठी येतात.
- ऋग्वेदः मण्कूर्मपुराण, उत्तरभाग, अध्याय ३५
श्लोकार्थ - तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ त्र्यंबकेश्वर नामक तीर्थ आहे ज्याला सर्व देवता आणि देवगण नमस्कार करतात. तिथे असलेल्या ज्योतिर्लिंगाचे पूजन करणाऱ्या भक्तांना ज्योतिष्टोम यज्ञाचे फळ प्राप्त होते.
याशिवाय गौतम ऋषींच्या तपस्येला प्रसन्न होऊन पतितपावनी गंगा इथे ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावली आहे. ह्या पवित्र गौतमी गंगेत भक्त स्नान केल्याने पापमुक्त होतात. त्यामुळे इथे केलेल्या सर्व पूजा अथवा विधी पूर्णत्वास येतात.
- श्री मार्कण्डेयपुराण, मार्कण्डेयकृत महामृत्युञ्जयस्तोत्र
श्लोकार्थ - मृत्युंजय महादेव आम्ही आपणास शरण आलो आहोत. हे प्रभु, कर्मबंधनात सापडल्यामुळे भोगत असलेल्या व्याधी, रोग, आजारातून आमची सुटका करावी.
स्मरणार्थ केलेले टिपण - सदर विधी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केल्यास अधिक लाभ होतो त्यामुळे जर शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र जप होत नसेल तरीही चिंता करण्याचे कारण नाही. त्र्यंबकेश्वर येथे अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींकडून श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासमोर भक्तांच्या वतीने महामृत्युंजय जप केला जातो. अधिक माहितीसाठी वर दिलेल्या ताम्रपत्रधारी गुरुजींना संपर्क करावा.