जेव्हा एखाद्या व्यक्तीचे अकस्मात निधन होते किंवा अपघाताने मृत्यू होतो अथवा सर्पदंशाने मृत्यू होतो, किंवा नागाची हत्या केली असल्यास अशा व्यक्तीला आणि नागाच्या मृतात्म्यास शांती लाभून नागहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी हि पूजा केली जाते.
अमावस्या, द्वादशी आणि पौर्णिमा असताना अथवा त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर हा विधी करता येतो.
हि पूजा केल्याने घरातील दुर्मरण आलेल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते, तसेच सर्पहत्येचा दोष नष्ट होऊन अनिष्ट स्वप्न दिसणे बंद होते.
हि पूजा करताना पुरुषांनी पांढरी धोती आणि कुर्ता, तसेच स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी, काळी साडी नेसू नये.
प्राचीन ग्रंथ धर्मसिंधु असे सांगते कि, नारायण नागबळी पूजा त्र्यंबकेश्वरलाच करावी, कारण इथे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि पतितपावनी गौतमी गंगा देखील आहे.
ह्या पुजसाठी तीन दिवसांचा कालावधी आवश्यक आहे.
त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरातच हि पूजा ३ दिवस केली जाते. गुरुजींनी दिलेल्या सामग्रीला देवतांना अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.
त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरातच हि पूजा ३ दिवस केली जाते. गुरुजींनी दिलेल्या सामग्रीला देवतांना अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.
कालसर्प योग शांती
ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत राहु आणि केतु निर्मित काळसर्प योग आला असेल अशा व्यक्तीने हि शांती पूजा करावी.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत असलेल्या राहु आणि केतु या ग्रहांच्या स्थानावर हे अवलंबून असते कि नेमका काय प्रभाव या योगामुळे होऊ शकतो.
जन्मपत्रिकेत राहु ग्रहांच्या स्थानावर हे अवलंबून आहे कि नेमक्या किती काळासाठी हा दोष असू शकतो, जसे राहु कुंडलीत प्रथम स्थानात आला असेल तर हा दोष २७ वर्षे असू शकेल, किंवा ५४ वर्षे असू शकेल जर राहु सहाव्या स्थानात आला असेल.
ह्या पुजसाठी ३ ते ४ तासांचा कालावधी आवश्यक आहे.
हि पूजा करताना पुरुषांनी पांढरी धोती आणि कुर्ता, तसेच स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी, काळी साडी नेसू नये.
हि पूजा पितृपक्ष अमावास्या, नागपंचमी, प्रत्येक महिन्यातील शिवरात्री, अथवा श्रावण सोमवारी केल्यास उत्तम आहे. याशिवाय ताम्रपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या शुभ मुहूर्तावर देखील हि पूजा केली जाते.
पूजेमध्ये होणाऱ्या सामग्रीचा खर्च यावर दक्षिणा अवलंबून आहे. पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींना दक्षिणा दिल्यावर पूजेची सांगता होते.
त्रिपिंडी श्राद्ध
हे एक योगदान आहे जे पैतृक आत्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना शांत करण्यासाठी केली जाते.
हि पूजा श्रावण, पौष, कार्तिक, फाल्गुन, वैशाख महिन्यातील पंचमी, अष्टमी, एकादशी, त्र्ययोदशी, चतुर्दशी आणि अमावास्येला करता येते.
हे एक अनुष्ठान आहे जे पितृदोषाने निर्मित झालेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सुचविले जाते.
हे अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो परंतु इतर पूजा ह्या पूजेसोबत केल्यास कालावधी वाढेल.
त्रिपिंडी श्राद्ध पूजा घरातील मुख्य कर्ता पुरुषाने केले पाहिजे. विवाहित किंवा अविवाहित दोनही व्यक्ती हे अनुष्ठान करू शकतात. परंतु स्त्रिया एकट्याने हे अनुष्ठान करू शकत नाही.
श्राद्ध समयी कांदा, लसूण, जिरा, काळे मीठ आणि डाळ अशा पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे.
तर्पण हि अशी विधी आहे ज्याद्वारे मृत पूर्वजांना भोजन, जल इत्यादि भोग प्रदान करून तृत्प केले जाते परिणामी त्यांना शांती लाभते आणि ते व्यक्तीला आशीर्वाद प्रदान करतात.
ह्या पूजेसाठी पुरुषांनी पांढरा कुर्ता व धोतीपरिधान करावा तर स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. स्त्रियांनी काळी साडी घालू नये.
ह्या पूजेची दक्षिणा हि पूजेसाठी लागणाऱ्या सामग्रीवर अवलंबुन आहे.
महामृत्युंजय जप
महामृत्युंजय जप करण्यासाठी पहाटे ४ वाजता ब्रह्म मुहूर्त अधिक लाभदायक आहे. हा जप वैयक्तिक किंवा सामूहिकरीत्या कार्तिक अथवा श्रावण महिन्यात केल्यास उत्तम आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सोमवारी केल्यास विशेष लाभ देणारा आहे. समस्या गंभीर असल्यास ताम्रपत्रधारी गुरुजींकडून हा जप योग्य मुहूर्तावर केला जातो.
हा जप वैयक्तिक किंवा सामूहिकरीत्या करता येतो. वैयक्तिक जप केल्याने लाभ प्राप्त होण्यात अधिक कालावधी लागू शकतो परंतु, सामूहिकरीत्या हा जप केल्यास इच्छित लाभ त्वरित प्राप्त होतात.
सर्व ग्रहांमुळे आलेल्या दोषांचे निवारण करण्यासाठी तसेच जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय जप केला जातो.
सर्वसामान्यापणे महामृत्युंजय जपसाठी ७ ते ८ तासाचा अवधी लागतो.
ह्या जपसाठी पुरुषांनी पांढरी धोती व कुर्ता परिधान करावा तर स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. स्त्रियांनी काळी साडी घालू नये.
महामृत्युंजय जपसाठी आवश्यक असलेली सामग्री तसेच उपस्थित गुरुजींवर अवलंबुन आहे कि किती दक्षिणा आवश्यक आहे.