“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”
floral design
Rudraksha

पुरोहित संघ संस्था

Rudraksha
roll roll

“त्र्यंबकेश्वर” मंदिर हे श्री महादेवांना समर्पित असे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. विश्वप्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे. त्र्यंबकेश्वर हे प्राचीन काळापासून तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते त्यामुळे अनेक पंडित वा गुरुजी इथे पूजा करतात. पेशवेकालीन इतिहासाप्रमाणे श्री नानासाहेब पेशवा यांच्याकडून दिले गेलेले “ताम्रपत्र” आहे अशा पुरोहितांना मुख्य मंदिरात पूजा-अभिषेक करण्याचा विशेष अधिकार प्राप्त आहे.

ताम्रपत्र असलेल्या अधिकृत पुरोहितांकडे त्र्यंबकेश्वर मधील पूजा करण्याचा अधिकार प्राप्त असल्याने त्यांना “ताम्रपत्रधारी” गुरुजी म्हटले जाते. पेशवेकालीन ताम्रपत्राचे संरक्षण तसेच अधिकृत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार त्र्यंबकेश्वरमधील “पुरोहित संघ” ह्या संस्थेकडे राखीव आहेत. हि संस्था मागील ज्ञात १२०० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे. सदर संस्थेमध्ये श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील मान्यवर उपाध्याय कार्यरत आहेत.

त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शन, पूजा आदींसाठी येणाऱ्या अगणित भाविकांच्या सेवेत संस्थेचे योगदान अमूल्य आहे. पुरातन काळापासून त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या भाविकांनी केलेल्या पूजा तसेच हवन, श्राद्ध विधींचा इतिहास वंशपरंपरेने इथल्या ताम्रपत्रधारी गुरुजींकडे व्यवस्थित नोंद केलेला आहे. आजही याचे पुरावे पिढ्यानपिढ्या संरक्षित आहेत. या पुराव्यांना “वंशावळी” असे म्हटले जाते.

त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना पूजा, श्राद्ध, हवन, अभिषेकादी महत्वपूर्ण धार्मिक कर्मांचे यथायोग्य मार्गदर्शन पुरोहित संघाने अधिकृत केलेल्या ताम्रपत्रधारी गुरुजींकडून केले जाते. ज्यामुळे भाविकांची वेळ आणि आर्थिक गैरसोय होत नाही. पुरोहित संघ संस्था त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करते.

त्र्यंबकेश्वर मंदिर लाईव्ह दर्शन:

“त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट” तर्फे त्र्यंबकेश्वर मंदिर लाईव्ह दर्शन हि एक नाविन्यपूर्ण सुविधा प्रदान करण्यात आली आहे, ज्यामुळे भक्तांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन लाईव्ह घेता येईल. हे महत्वपूर्ण पाऊल यासाठी उचलण्यात आले कि, ह्यावर्षी भक्तांना कोव्हीड-१९ ह्या महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाशिवरात्रीला दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करता आला नाही. सरकारकडून आलेल्या निर्णयाला अनुसरून मंदिर काही काळ बंदच असणार आहेत, त्यामुळे भक्तांना घरबसल्या दर्शन प्राप्त व्हावे यासाठी हे “लाईव्ह दर्शन” करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केले आहे.

on with trishul त्र्यंबकेश्वर अधिकृत गुरुजी : om with trishul

Verify Purohitsangh Logo

त्र्यंबकेश्वर मंदिरात कार्यरत असलेल्या सर्व अधिकृत आणि नोंदणीकृत “ताम्रपत्रधारी गुरुजी” पुढे दिलेल्या यादीत समाविष्ट आहेत. केवळ ह्या गुरुजींकडे विशेष पूजा जसे काळसर्प दोष पुजा, नारायण नागबळी पूजा, महामृत्युंजय मंत्र जाप, त्रिपिंडी श्राद्ध पूजा तसेच अन्य विधी यथासांग पद्धतीने त्र्यंबकेश्वर मध्ये करण्याचे अधिकार ताम्रपत्र रूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून आपण आमच्या अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींना संपर्क करू शकता.

kalash त्र्यंबकेश्वर मधील विविध पूजा kalash

त्र्यंबक नगरीत आल्यावर स्वर्गप्राप्ती झाल्याची अनुभूती अनेक भक्तांना होते कारण इथले वातावरण दिव्य, धार्मिक व निसर्गरम्य आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी अति महत्वाचे असे मंदिर आहे. यास कारण हे आहे कि फक्त ह्या ज्योतिर्लिंगाच्या ब्रह्मा, विष्णु व महेश हे एकत्रित ज्योतिर्लिंग रूपाने विद्यमान आहेत. त्रिमूर्तींचा निवास असल्याने हे स्थान भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे स्वर्गच म्हटले जाते.

भक्तांच्या मनोकामना पूर्तीसाठी अनेक पूजा, विधी प्राचीन काळापासून इथे केल्या जातात. पौराणिक संदर्भानुसार दक्षिणवाहिनी गंगा नदीच्या तीरावर आणि ज्योतिर्लिंग असलेल्या परिसरात केलेले पूजा अथवा अनुष्ठान हे त्वरित फळ प्रदान करतात, त्यामुळे कुशावर्त तीर्थावर तसेच ताम्रपत्रधारी गुरुजींच्या निवासस्थानी काळसर्प दोष पुजा, नारायण नागबळी पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, रुद्राभिषेक, रुद्रयाग, कुंभ विवाह, अर्क विवाह, महामृत्युंजय मंत्र जाप विधी यासारख्या अनेक धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने ताम्रपत्रधारी गुरुजींकडून केल्या जातात.

|| ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवम् ऋत्विजम् होतारम् रत्नधातमम् ||

- ऋग्वेद, सूक्त १, प्रथम मंडल

श्लोकार्थ - आम्ही यज्ञाचे पुरोहित, अनुदान करणारे देवता, यज्ञाचे संपादन करणारे ऋत्विज, देवतांचे आवाहन करणारे होता आणि याचकांना रत्नाने विभूषित करणाऱ्या पवित्र अग्निदेवतेला वंदन करून त्यांची स्तुति करतो.

स्कंद पुराण, शिव पुराण, गरुड पुराण तसेच अनेक प्राचीन धर्मग्रंथांमध्ये त्र्यंबकेश्वरला केलेल्या पुरातन पूजा, जपानुष्ठान, श्राद्धादि विधी त्वरित फलदायी होतात असे वर्णन आले आहेत.

इथे होणाऱ्या धार्मिक विधींची शास्त्रोक्त माहिती व अधिकार वंशपरंपरेने इथल्या स्थानिक ताम्रपत्रधारी गुरुजींना प्राप्त आहे. त्यामुळे भाविकांनी पुरोहित संघाने अधिकृत केलेले ताम्रपत्र आणि नोंदणीकृत प्रमाणपत्राची खात्री करूनच पूजा-अनुष्ठान केल्यास त्यांची आर्थिक फसवणूक टाळता येईल.

om with trishul पुरोहित संघाचे प्रतीक चिन्ह अथवा लोगोची माहिती om with trishul

purohitsangh logo

" पुरोहित संघ ", संस्थेचे प्रतीक चिन्ह हे एका आध्यात्मिक विचारातून निर्मिले गेले आहे जसे चित्रांत दिसत आहे, ज्यात एक ऋषी दाखविले आहे, जे “धार्मिक ग्रंथ – वेद” पठण करीत आहे. प्रतीक चिन्हात असलेले केशरी आणि पिवळा रंग हिंदू परंपरेनुसार आध्यात्मिकता आणि शुद्धतेला दर्शवितात.

"वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः" ह्या श्लोकाचा समावेश प्रतीक चिन्हात केलेला आहे, ज्याचा अर्थ असा होतो कि, पुरोहित, पुरोहिती (अमात्य) राष्ट्राला जीवित ठेवतील. पुरोहित शब्दाचा अर्थ असा आहे कि, जो भक्तांसाठी लाभदायक कार्य करण्यास इच्छुक आहे. प्राचीन काळात अशा मान्यवरांना पुजारी किंवा पुरोहित या नावाने संबोधिले जात होते. “पुजारी” हे राष्ट्रीय समृद्धी, गौरव, आणि विकास यांसाठी ओळखले जातात कारण ते विवेक आणि उचित-अनुचित यातील भावना जागृत करण्यात सक्षम असतात. त्यामुळे ते भक्तांना योग्य मार्गदर्शन आणि जागृती प्राप्त व्हावी यासाठी कार्यमग्न असतात.

पुरोहित संघ संस्थेचे अधिकृत प्रतीक चिन्ह इथे दर्शविलेले आहे. त्यामुळे पुजा बुकिंग करताना, खात्री करावी कि आपण ताम्रपत्रधारी गुरुजींच्या संपर्कात आहात कि अनधिकृत पंडितांच्या संपर्कात. आपल्या माहितीसाठी आम्ही काही बनावट प्रतिक चिन्ह येथे दाखवले आहे. त्यामुळे कुणाच्या बोलण्यात न येता केवळ पुरोहित संघ संस्थान, त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत पुरोहितांकडूनच धार्मिक अनुष्ठान संपन्न करावे, हि विनंती.

whatsapp icon